• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 9, 2021

सिडकोच्या पोकलेनसमोर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला ठिय्या

adminbyadmin
in Uncategorized
0
सिडकोच्या पोकलेनसमोर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला ठिय्या

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

सिडकोच्या अतिक्रमण विभागाला रिकाम्या हाती परतावून लावले 

पनवेल : ओवळे गावात तोड कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाला रिकाम्या हाती परतावून लावण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या पोकलेनसमोर ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन केले. 

दरम्यान लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, आमदार महेश बालदी, सामाजिक कार्यकर्ता निलेश पाटील, युवा नेते दशरथ भगत, जे. डी. तांडेल यांनी या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. सायंकाळी सिडको अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर सिडकोच्या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. येत्या तीन ते चार दिवसात या संदर्भात सिडको, लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती, ग्रामस्थ यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत योग्य पुनर्वसनाचा  सकारात्मक तोडगा निघाला तरच कार्यवाही करण्यास सहमती असेल असा ईशारा सिडकोला समितीने दिला आहे. 

      भूमिपुत्र, स्थानिक, प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांच्या सदैव पाठिशी राहणारे ७० वर्षीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे राहून ठिय्या आंदोलन केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक आणि आभारही मानले.  अंगावरून बुलडोझर नेला तरी चालेल पण जो पर्यंत कारवाई थांबवत नाही तो पर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी घेत ग्रामस्थांना मोठा आधार दिला.  त्यामुळे आंदोलकांमध्ये यावेळी मोठे बळ दिसले. प्रेरणास्थान दि. बा. पाटील यांनी आम्हाला ‘संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही’ हे शिकवले आहे, त्यांचा आशिर्वाद आणि आदर्शाने आम्ही काम करीत असून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढत राहू, संघर्ष करत राहू, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले.

सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज (शुक्रवार, दि. ०९ जुलै) मोठा पोलिस बंदोबस्त आणि सिडकोच्या सुरक्षा रक्षकांच्या फौजफाट्यासह बुलडोझर, पोकलेन घेऊन येत ओवळे येथे कारवाई करण्याचा प्रयत्न केला.यावेळी केंद्र सरकारच्या एका प्रकल्पासाठी केवळ रिक्त शाळेवर कारवाई करणार आहोत असे सिडको अधिकाऱ्यांचे म्हणणे होते,परंतु त्या कारवाई चे आड येथील तीन पात्र घरे देखील तोडण्याचा सिडको चा मनसुबा असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुलडोझर समोर ठिय्या देत अतिक्रमण विरोधी पथकाला रोखून धरले. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधी तोडक कारवाई न करण्याचे आदेश असताना सुद्धा अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी ढगे यांचे ढग ओवळे गावावर कसे काय जमले? असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत होता?

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, पनवेल तालुक्यातील खालचे ओवळे येथे घेरे तोडण्यासाठी सिडको अधिकारी पोलीस फौजफाट्यासह आले. महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती या कारवाईमुळे रडत आहेत. येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे पुनर्वसन नाही. आमच्या घराची पात्रता नाही, कुठे जागा आणि पुनर्वसन करणार याचा अद्यापही पत्ता नाही. असे असतानाही घरांना हात लावत असाल तर कुठल्याही परिस्थितीत कारवाई करू देणार नाही. हा निर्धार करूनच ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत. मला ग्रामस्थांचा फोन आला त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो. गोरगरिबांचे घरे तोडण्यासाठी आणि संसार उध्वस्त करण्यासाठी फार मोठा फौजफाटा सिडकोने का आणला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यावेळच्या प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून महेंद्र घरत, बबन पाटील यांनी जाऊन घरांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न मांडला होता, त्या निवेदनात आमचीही स्वाक्षरी आहे. त्यावेळी योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय घरे तोडली जाणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. मात्र सिडकोचे अधिकारी येथे येऊन घरे तोडायला आले. पोलीस गाड्या, पोकलेन, जेसीबी आणले आहेत, ते आमच्या अंगावरून गेले तरी चालतील आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी घेतला. 

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडको अस्थापानावर ठपका ठेवत सांगितले की, प्रकल्पग्रस्तांची गरज, मागण्या, आणि पुनर्वसन या करता सिडको अजिबात कार्यतत्परता दाखवत नाही, परंतु कारवाई करताना मात्र ते वायूच्या वेगाने हजर होतात. आज पावसाळ्यात देखील तोडक कारवाई होत आहे त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही जे आंदोलन करत आहोत त्याचा सिडको सूड तर उगवत नाही ना? असा संशय आमच्या मनात येऊ लागला आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय म्हणजेच ९५ प्रकल्पग्रस्त गावांवर अन्याय आहे, तो कदापिही खपवून घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठणकावले.  

        या आंदोलनात रामशेठ ठाकूर यांच्या सह प्रकल्पग्रस्त लॉरी चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदराज मुंगाजी, एडवोकेट रेश्मा अमित मुंगाजी, तंटामुक्ती गाव अध्यक्ष अमित मुंगाजी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर,सदस्य दत्ता पाटील, सुनिल म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, अमीर म्हात्रे, सुनिल पाटील, गजानन पाटील,  आदी मान्यवरांच्या समवेत ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

        यावेळी नंदराज मुंगाजी यांनी म्हंटले कि, सिडकोचे अतिक्रमण विभाग गावात येऊन तोड कारवाई करणार आहे हे समजताच आम्ही या ठिकाणी दाखल झालो, तसेच तातडीने ग्रामस्थांना सहकार्य करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर ग्रामस्थांसोबत ठिय्या मांडून बसले. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी झालेल्या आंदोलनाचा राग काढण्यासाठी कारवाई करत असेल तर आम्ही सिडकोला दाखवून देऊ होणाऱ्या विमानतळ होणार नाही. आम्हाला घरांची पात्रता मिळाली योग्य पुनर्वसन झाले तरच आम्ही घरे खाली करू नाही तर अजिबात शासनाचे ऐकणार नाही. तुमचा बुलडोझर परत न्या. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही घरे मोडायला येता. आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्हाला न्याय द्या. आम्ही सहकार्य करतो तसे तुम्हीही करा. 

          यावेळी सामाजिक कार्यकर्ता रुपेश धुमाळ यांनी बोलताना सांगितले कि, कोरोना आणि पावसाळा पाहता लोकांना बेघर करणे उचित नाही. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी लाखो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले हे सरकारला माहित आहे. एवढा मोठा प्रसंग असताना आणि पावसाळा असताना घरे तोडण्याचे आदेश दिले जाते हे अत्यंत चुकीचे आहे. देशाच्या विकासासाठी येथील लोकांनी पिकत्या जमिनी राहती घरे दिली आहेत एवढ्या त्यागाचा विसर शासनाला, सिडकोला पडला आहे. सिडकोने येथील लोकांशी कृतज्ञ राहिले पाहिजे. असेही त्यांनी म्हंटले. 

Previous Post

डब्बे बदलून उपयोग नाही, देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ : नाना पटोले

Next Post

१४ दिवसाच्या आत कोविड भत्ता न दिल्यास मनसे कामगार सेना करणार काम बंद आंदोलन

Next Post
१४ दिवसाच्या आत कोविड भत्ता न दिल्यास मनसे कामगार सेना करणार काम बंद आंदोलन

१४ दिवसाच्या आत कोविड भत्ता न दिल्यास मनसे कामगार सेना करणार काम बंद आंदोलन

१ ते १६ डिसेंबरपर्यंत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान

खासगी कमानींना परवानगी देवून गावांची ओळख पुसण्याचे महापालिकेचे षडयंत्र : मनोज मेहेर

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com