संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने मंजूर गुरूवारी कोविड भत्ता, मयत कामगारांचा ७५ लाख इन्शुरन्स, घंटागाडी कामगरांचा १६ महिन्यातील फरक देण्यासाठी १४ दिवसाचा कालावधी मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. १४ दिवसाच्याआत वरील मागण्या मंजूर न झाल्यास नवी मुंबई मनपातील सर्व कामगार काम बंद आंदोलन करतील असा इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या वतीने देण्यात आला.
नवी मुंबई मनपातील सर्व विभागातील सुमारे ७२०० कंत्राटी कामगार,
२५१५ कायम कामगार ५४४ ठोक मानधनवरील कामगार व आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोरोना काळामध्ये
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा भारती ७४१ असे एकूण ११ हजार कामगारांना २३ मार्च २०२० ते
३१ मे २०२० या दरम्यानचा ३०० रुपये प्रती दिन कोरोना भत्ता देणार असे परिपत्रक २७ एप्रिल
२०२१ रोजी काढूनसुद्धा काही कामगार वगळता इतर कामगारांना हा भत्ता अदयाप देण्यात आलेला
नाही.
यावेळी कामगारसेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, युनियन
अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, कोषध्यक्ष
भूषण बारवे, उपाध्यक्ष रुपेश कदम, उपाध्यक्ष – रमेश पर्हाड,रणजीत सुतार, महेंद्र म्हात्रे,
सुनील राठोड, विजय राठोड, अरविंद बोबले, देविदास भोईर, अशोक पाटील, सुयश पाटील व कामगार पदाधिकारी उपस्थित
होते.