संदीप खांडगेपाटील : ८३६६९९२४६४६, ९८२००९६५७३
sandeepkhandgepatil@gmail.com Navimumbailive.com@gmail.com
रिकामा गॅस बाटला ठेवला उलटा आणि बनविले जेवण चुलीवर
कळंबोली ब्लॉक शहराच्यावतीने करण्यात आली निदर्शने
पनवेल : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारच्या इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार कळंबोली ब्लॉक शहर काँग्रेसच्यावतीने के एल २ मध्ये काँग्रेस महिला पदाधिकारी यांनी चुलीवर जेवण बनवून गॅसचा रिकामा बाटला उलटा ठेवून निषेध नोंदवला व उपस्थित पदाधिकारी यांनी भाजपाच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा शशिकला सिह, जिल्हा उपाध्यक्ष संतोष चिखलकर, जयश्री खटकल, रामचंद्र पाटील, जयेश लोखंडे, सुभाष गायकवाड, अरुण ठाकूर, रमेश राव, रोहित पाटील, भागवत पाटील, नरेश कुमारिका, कलावती माळी, शिल्पा घोरपडे, सुनीता माळी, आरती पोतदार, सुरेश खोसे, भावना सिंग, विलास मागाडे, चेतन घोडके, प्रतीक मोदी, संजय विटेकर, अनिल सुर्यवंशी, शौकत खान, बाळू खरजे, आशादेवी, सविता सावंत, सती भिडे, प्रमिला कुमारी देवी, सपना दास,अरुण पालकर, राणी मॅडम, अनिता दळवी, सिंधू सिंग यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
** हे आंदोलन नसून सर्वसामान्य नागरिकांना भूलथापांच्या आहारी घालणाऱ्या भाजपच्या नेत्यांना खडे बोल असले तरीही येथील नागरिकांना खरं आणि खोटं काय हे दर्शविणारे हे आंदोलन आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसने देशावर सत्ता केली आणि त्यावेळी जी आंदोलने करण्यात आली त्या आंदोलनाचा भाग तेव्हाची देश वाचविण्यासाठी असणारी भाववाढ आणि आज देश लुटणारी भाववाढ याचा जनतेने विचार केला पाहिजे. पैसा झाडाला उगवत नाही, अशी म्हण आहे. मग जनतेच्या हितासाठी आम्ही काँग्रेसवासी तेव्हाही लढलो आणि आताही लढतच आहोत, हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.
– सुदाम पाटील, कार्याध्यक्ष, पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी