• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 13, 2021

महागाई, कोरोना प्रश्नावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपाचा डाव : नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष; मुंडे, खडसेंचा वापर करुन डावलले

मुंबई : पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे आणि मोदी सरकार देशाला लुटायचे काम करत आहे, त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत आहे. मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे, चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे. या महत्वाच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजपा जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करुन नंतर त्यांना बाजूला करते याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपाने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले, झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत. खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते असा संशय येतो. भाजपा हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही कोर्टात रद्द झाले आहे.

मविआ सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहिम राबवली गेली. १०० कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक असून ज्यांनी आरोप केला त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली जात नाही. अंटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास केला जात नाही, हे सर्व स्क्रिप्टेड असून त्याप्रमाणेच होत आहे, असे पटोले म्हणाले.      

Previous Post

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला करोनाची राजधानी बनवले : आ. आशिष शेलार

Next Post

वाशी रूग्णालयातील कामगारांची इंटकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

Next Post
वाशी रूग्णालयातील कामगारांची इंटकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

वाशी रूग्णालयातील कामगारांची इंटकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

इंटकच्या पाठपुराव्यामुळे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार

इंटकच्या पाठपुराव्यामुळे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार

आषाढी एकादशीनिमित्त ‘अवघे गर्जे पंढरपूर’

आषाढी एकादशीनिमित्त 'अवघे गर्जे पंढरपूर'

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com