संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gamil.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसरात श्री. गणेशजी नाईक चॅरिटेबल संस्था आणि भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत व जनसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून मास्क वाटपास सुरूवात झाली आहे.
गुरूवारी सकाळीच प्रभागात भाजपकडून मोफत मास्क वाटपास सुरूवात झाली असून प्रभागात घरोघरी जावून मास्क वाटप केले जाणार असल्याची माहिती जनसेवक गणेश भगत यांनी दिली. आज सकाळी सेच्युरी सोसायटीमध्ये घरोघरी जावून मास्क वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रभागातील सर्व रिक्षा स्टॅण्ड, सर्व फेरीवाले, भाजी मार्केटमधील विक्रेत्यांना व ग्राहकांना मास्कचे वाटप करण्यात आले. प्रभागात ७५०० हून अधिक मास्कचे वाटप केले जाणार असून प्रभागातील सर्व गृहनिर्मांण सोसायट्या व मार्केट येथेही मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
आज मास्क वाटप करताना जनसेवक गणेश भगत यांच्यासमवेत जेष्ठ समाजसेवक अनंत कदम, चंद्रकांत महाजन, रमेश नार्वेकर, दत्तात्रय तोंडे, सागर मोहिते, मंगेश कदम, अजय खंबे, रविंद्र भगत उपस्थित होते. भाजपाच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी ५ वर्षाच्या कालावधीत मागील १५ वर्षात न झालेली कामे करून प्रभागाचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. शहरी भागातील सर्वात स्वच्छ प्रभाग असा महापालिका प्रशासनाकडून या प्रभागाला पुरस्कारही मिळालेला आहे.
जनसेवक गणेश भगत आणि माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी कोरोना महामारीच्या काळात गेली २ वर्षे प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. दोन वर्षात भगत परिवाराकडून ४ वेळा रहीवाशांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी ३ वेळा मास्कचे वाटप करण्यात आले असून दोन वर्षात सातत्याने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सॅनिटाईजची फवारणी व धुर फवारणी करण्यात येत आहे. आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचेही वितरण करण्यात आले आहे. कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रूग्णालयीन सुविधा तसेच रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे, हॅण्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. आज सकाळपासून जनसेवक गणेश भगत यांनी रहीवाशांना मास्कचे वाटप सुरू केल्याने कोरोना काळात भाजपचे कार्य जोमाने सुरू असल्याचे पुन्हा एकवार रहीवाशांना जवळून पहावयास मिळाले आहे.