Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : भाजपाचे युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुकशेत गावामध्ये २० जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे तसेच तुळशी रोप वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन कुकशेत गावातील जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत जय गजानन मित्र मंडळ संचालित बी मोर फिट जिम या ठिकाणी हे आरोग्य शिबर होणार असून या शिबिरामध्ये रॅडम शुगर, रक्तदाब तपासणी, नेत्र तपासणी, बामी, ईसीजी तपासणी, सर्व आजारांवर मेडिसीनचे डॉक्टर, मोफत औषध याचा समावेश असणार आहे., याच कार्यक्रमात मोफत तुळशीचे वाटपही केले जाणार आहे.
कोरोना महामारीचे असलेले संकट, म्युकरकोसिस, डेल्टासह साथीच्या आजारांची टांगती तलवार या पार्श्वभूमीवर प्रभाग ८५ व ८६ सह नेरूळ नोडमधील रहीवाशांनी या आरोग्य शिबिरात सहभागी होवून आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन जय गजानन मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.