संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड, रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हातभार लावण्यासाठी सानपाडा भागातील भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी पुढाकार घेतला असून महाड भागातील लोकांसाठी त्यांनी धान्याची, पाण्याची, कपड्याची मदत केली आहे.
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजसेवक पांडुरंग आमले, साईभक्त मित्र मंडळ, साईभक्त महिला फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मदत महाड भागातील लोकांसाठी जमा करण्यात आली. यात ५० गोणी साखर, ५० गोणी तूरडाळ, ५० गोणी गहू. कपडे, शाली, बेडसीट, बिस्कटची पाकिटे, पाण्याच्या बाटल्यांसह अन्य वस्तूंचा समावेश आहे. देवा ग्रुपच्या माध्यमातून ही मदत महाडवासियांना पाठविण्यात आली असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली.