संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : माझी जबाबदारी, माझे कर्तव्य या सामाजिक भावनेतून भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई सरचिटणीस व नेरूळ –सिवूडस भागातील भाजपाचे युवा नेते रणजित नाईक यांनी कोकणातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करीत जीवनावश्यक वस्तुंनी भरलेला टेंपो आज रवाना केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात सर्वच ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामीण भागात, खेडे गावात व शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. आपले कर्तव्य म्हणून नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाणारे ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रणजित नाईक यांनी नवी मुंबई येथून मदत पाठविली आहे. चिपळूण येथील गरजूंना समाजसेवक रणजित नाईक, ऊत्कर्ष मित्र मंडळ, रिक्षा चालक व स्थानिक रहिवाशी यांच्या तर्फे मदत पोचवण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रारंभापासून रणजित नाईक यांनी त्यांच्या निवासी प्रभागात सातत्याने जनसेवा करत आपले सक्रिय योगदान आजवर दिले आहे. अतिवृष्टीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या नुकसानीमुळे तेथील नुकसान झालेल्या लोकांना हातभार लावण्यासाठी रणजित नाईक यांनी पुढाकार घेतला आहे.