संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : महापालिका व खासगी शाळांतील कोरोना रूग्ण (विशेषत: तुरूंगातील कैदी) हटवून ते क्वारन्टाईंन सेंटर बंद करून शाळा पूर्ववत सुरू करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
राज्यात कोरोना महामारीचे प्रमाण आटोक्यात आल्यावर राज्य सरकारने दि. ३ ऑक्टोबर २०२१ पासून शाळा सुरू केल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या घटनेला आज १२ दिवसाचा कालावधी लोटला तरी मुंबईतील जवळपास ७९ शाळा बंदच आहेत. या शाळांमध्ये महापालिका व खासगी शाळांचा समावेश आहे. शाळा बंद असल्याने या शाळेतील मुलांना आजही ऑनलाईन पध्दतीनेच शिकविण्यात येत आहे. चौकशी केल्यावर या शाळा क्वारन्टाईंन सेंटर असल्याने सुरू करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास ३०० कैदी या शाळांमध्ये कोरोना आजारावर उपचार घेत असल्याचे समजले आहे. कैदी सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे, शाळांची नाही. कैद्यांच्या उपचाराची अन्यत्र तातडीने व्यवस्था करण्यात यावी. मुलांच्या शाळा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. या शाळांतील कैदी अन्यत्र उपचारासाठी हलवून शाळांमधील क्वारन्टाईंन सेंटर बंद करून शाळा त्वरीत सॅनिटाईज करण्यात याव्यात. तसेच लवकरात लवकर शाळांतून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिकविण्यात यावे. केवळ कैद्यांच्या उपचारासाठी मुलांच्या शाळांना क्वारन्टाईंन सेंटर बनविणे व मुलांना आफॅलाईन शिकविण्यापासून वंचित ठेवावे हे चित्र पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्य सरकारने तात्काळ या कैद्यांना अन्यत्र हलवून येथील क्वारन्टाईंन सेंटर बंद करावे व मुलांना शाळेत शिकविण्यास सुरूवात करावी, यासाठी संबंधितांना आदेश देण्याची हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.