संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये शिवसेना नगरसेवक सोमनाथ वासकर व त्यांच्या अर्धागिणी नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वासकर यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग ही गेल्या काही वर्षात नित्याचीच बाब झाली आहे. आजही सानपाड्यात शिवसेना शाखा व भारतीय पोष्ट कार्यालय (सानपाडा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना शाखा सानपाडा येथे आयोजित सुकन्या योजना राबविण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सानपाडावासियांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सुकन्या योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या मुलीच्या भविष्याकरिता सानपाड्यातील पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, त्या सर्व पालकांना आपल्या लाडक्या मुलीच्या नावे उघडण्यात आलेले बचत खाते वाटप करण्यात आले. सहभागी सर्व मुलींच्या बचत खात्यात स्थानिक शिवसेना नगरसेविका कोमल सोमनाथ वासकर यांनी १००₹ रूपये जमा करुन बचत खात्याची सुरुवात करुन दिली. त्यास्तव पालक वर्गानी स्थानिक नगरसेविका कोमल सोमनाथ वासकर यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
बचत खाते पालक व मुलीच्या स्वाधीन करताना, नगरसेवक सोमनाथ वासकर, स्थानिक नगरसेविका कोमल सोमनाथ वासकर, पोष्ट अधिकारी बळदेव भुयंभर, शिवसेना विभागप्रमुख आशिष वास्कर, महिला उपविभाग संघटक सौ. सुलभा केसरकर , शाखाप्रमुख रणधीर सुर्वे, युवासेना पदाधिकारी प्रल्हाद गायकवाड उपस्थित होते.