संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील गेल्या दोन दशकपासून ओळखले जाणारे मातब्बर राजकीय व सामाजिक प्रस्थ असलेले दशरथ सिताराम भगत (नाना) दशरथ सीताराम भगत यांच्या वतीने सुरु करण्यात आलेले नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेला येत्या १५ ऑटोबर २०२१ रोजी ३ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने विविध लोकउपयोगी उपक्रम राबवून संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
नागरिकांचे प्रश्न तसेच विविध समस्यांचे निराकरण व्हावे या करिता नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेची तीन वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली होती. सदर संस्थेच्या मार्फत अनेक आंदोलने, उपक्रम, शिबीर, वेळोवेळी उद्भवत असलेले जनतेचे प्रश्न तसेच कोरोना काळात विविध लोकउपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला, युवक आणि विद्यार्थ्याना समाज कार्य करण्यास अल्पावधीतच एक वेगळे व्यासपिठ उपलब्ध झाले.
१५ ऑटोबर २०२१ रोजी संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे सल्लागार युवा नेते निशांत भगत यांच्या माध्यमातून जनतेला १ दिवसीय शासकीय दाखले आणि योजनांची सेवा पुरवण्यासाठी ‘मोफत सेवा केंद्र’ आयोजित करण्यात आले होते.
सदर सेवा केंद्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, आरोग्य ओळखपत्र, न्यूनतम पेंशन (वय १८ ते ४०), जेष्ठ नागरिक ओळखपत्र, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नोंदणी असे विविध शासकीय दाखले व योजने नागरिकांना मोफत सेवा देण्यास नियोजन करण्यात आले होते. मोफत सेवा केंद्राला जनतेनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल १२०८ नागरिकांनी सदर शिबिराचे लाभ घेतले.
सदर प्रसंगी संस्थेचे सल्लागार युवा नेते निशांत भगत, नगरसेविका श्रीमती फशीबाई भगत, समाजसेवक संदीप भगत, पदाधिकारी देवेंद्र खडे, विठ्ठलराव यादव, जयसिंग सोनावणे, सचिन शिंदे, दीपक तारी, संतोष पाटील, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.