संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राजकीय व सामाजिक जीवनात महिलांची ताकद लक्षणीय आहे. माझ्या निवडणूकीच्या अनुभवावरून सांगते, निवडणूकीत महिला वर्ग माझ्यासोबत सुरूवातीपासून शेवटपर्यत होता आणि आजही आहो. महिला जिकडे, सर्व घर तिकडे असते. घरातील पुरुष कोठेही फिरले तरी घरात शेवटी त्यांना महिलांचेच ऐकावे लागते. त्यामुळे महिला ज्यांच्यासोबत, विजयही त्यांच्यासोबतच असल्याचे प्रतिपादन बेलापुर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडूरंग आमले यांनी साईभक्त महिला फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रभाग ७६ मधील विधवा महिलांसाठी सुरू केलेल्या ‘साईभक्त स्त्री आधार योजने’चा शुभारंभ आमदार मंदाताई यांच्या हस्ते झाला. नवरात्र उत्सव काळात साईभक्त महिला फांऊडेशन व भाजपा प्रभाग ७६च्या माध्यमातून परिसरातील महिलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण आमदार मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे आयटीसेल संयोजक व जिल्हा महासचिव सतीश निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना गेल्या काही वर्षापासून पांडूरंग आमले प्रभाग ७६ मध्ये उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगताना आमलेंनी कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. आमलेंनी सामाजिक कार्य करताना जनतेची नस बरोबर ओळखली आहे. महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम पांडूरंग आमले राबवित आहेत. परिसरातील महिला पांडूरंग आमलेंसोबत असल्याने येत्या पालिका निवडणूकीत पांडूरंग आमले यांचा विजय निश्चित असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. सतीश निकम यांनीही यावेळी समयोचित भाषण करताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. पांडूरंग आमले यांनी आपल्या भाषणातून परिसरासाठी कार्य करताना आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आपल्याला सतत मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.
यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष राजेश राय, वाशीतील माजी नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आबा जगताप, मंडल अध्यक्ष श्रीमंत जगताप, शशी नायर, निलेश वर्पे, देवनाथ म्हात्रे, राजेश गायकवाड, विश्वास कणसे, ज्येष्ठ कलावंत काजरोळकर काका, पत्की काका, प्रशांत सणस, नायसे, सुनील शिंदे, नाना शिंदे, दिपिका बाम्हणे, आज्ञा गव्हाणे, नीता आंग्रे, सुलोचना निंबाळकर, संचिता जोएल, प्रतिभा पवार, दिशा केणी, विमल पाटील, स्वाती हाडवळे, हेमा पवार आदी उउपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश नाईक यांनी तर उपस्थितांचे आभार रमेश शेटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदाताई पांडूरंग आमले व त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.