संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@ gmail.com
नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ पश्चिमचे तालुकाध्यक्ष महादेव पवार यांचा २५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असल्याने प्रभाग ८५-८६ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत विविध सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची असल्याची माहिती प्रभाग ८५ चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहिते यांनी दिली.
१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पॅनकार्ड शिबिर, २० ऑक्टोबर व २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आधार कार्ड शिबिर, २२ ऑक्टोबर व २३ ऑक्टोबर सांयकाळी ५ ते ७ या वेळेत ना नफा, ना तोटा या तत्वावर साखर, गुळ, तेल, डालडा, रवा, मैदा याची विक्री, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आरोग्य शिबिर, सांयकाळी ७ ते ९ या वेळेत परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व एमपीएसी परिक्षेच्या धर्तीवर तहसीलदार राहूल मोरे यांचे मार्गदर्शन, २५ ऑक्टोबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी कोरोना योध्दा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात डॉक्टर पोलीस, परिचारिका, होमगार्ड यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी महादेव पवार यांच्या सामाजिक कार्याची दखल म्हणून अभिष्ठचिंतन सोहळाही आयोजित करण्यात येणार असल्याची यशवंत मोहिते यांनी दिली.