संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील छत्रपती संभाजी महाराज या महापालिका उद्यानातील तसेच जुईनगर सेक्टर २४ मधील गणेश क्रिडांगणातील समस्यांचे तातडीने निवारण करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्र्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोनमध्ये महापालिकेचे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे. या उद्यानात जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उद्यानातील संगीत यंत्रणाही बंद अवस्थेत आहे. तसेच या ठिकाणी उद्यानात असणारे पथदिवे बंद असल्याने सांयकाळनंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यत उद्यानात अंधार असतो. त्यामुळे उद्यानात वॉक करण्यासाठी येणाऱ्या महिला व मुलींबाबत छेडछाड व अन्य दुर्घटना घडण्याची भीती आहे. तसेच गर्दुले व अन्य मद्यपिंकडून लुटमारही होण्याची शक्यता आहे. उद्यानातील संगीत यत्रंणा पूर्ववत सुरू करण्याचे, बंद पडलेले दिवे दुरूस्त करण्याचे व जंगली गवत काढून टाकण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. तसेच जुईनगर सेक्टर २५ मधील महापालिकेच्या गणेश क्रिडांगणातही जंगली गवत वाढल्याची व क्रिडांगणातील दिवे पूर्णपणे बंद असल्याची समस्या आहे. त्या ठिकाणचे जंगली गवत काढून टाकण्याचे व बंद पडलेले दिवे दुरूस्त करण्याचे आपण संबंधितांना निर्देश देवून जुईनगर व नेरूळवासियांना दिलासा द्यावा देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.