संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोव्हीड १९ च्या प्रादुर्भावामुळे केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घणसोली, सेक्टर ३ येथील सेंट्रल पार्क उद्यान नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेले नव्हते. तथापि राज्य शासनाकडून प्राप्त सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार उद्याने नागरिकांच्या वापराकरिता खुली करण्यात आली असून त्यास अनुसरून उद्या २२ ऑक्टोबरपासून नवी मुंबई महानगरपालिकेचे घणसोली, सेक्टर ३ येथील सेंट्रल पार्क उद्यान सकाळी ५.३० ते सकाळी १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांच्या वापराकरिता खुले करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झालेला दिसत असला तरी कोरोना अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून नागरिकांनी / मुलांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. नो मास्क – नो एन्ट्री हे तत्व उद्यान प्रवेशासाठीसुध्दा लागू असून २ व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि कोव्हीडच्या सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.