पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : गणेश हांडेपाटील : ८३६९९२४६४६
सातारा : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एमआयएमची पाळेमुळे विस्तारण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पाया मजबूत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने सर्वप्रथम एमआयएम विद्यार्थी आघाडीने पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून आढावा बैठका घेताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून पक्षसंघटना बळकटीवर सर्वप्रथम भर दिला जाणार असल्याची माहिती एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी दिली.
एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कुणाल खरात आणि एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांच्या निर्देशानुसार, एमआयएम विद्यार्थी आघाडीमध्ये कार्यरत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना कळविण्यात येत आहे की, आपण पक्षसंघटनात्मक वाढीसाठी केलेले कार्य व पक्षाच्या व्यासपिठावरून जनसामान्यांसाठी केलेले कार्य, पक्षसंघटना विद्यार्थी वर्गात तसेच युवकांमध्ये लोकाभिमुख होण्यासाठी केलेले कार्य या सर्वांचा विस्तृत कार्यअहवाल बनविणे. १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत एमआयएम विद्यार्थी संघटनेची बांधणी, विस्तारासाठी चर्चा, पक्षवाढीसाठी राबवायच्या संभाव्य योजना, संकल्पना यावर चर्चा करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी करण्यात येणार आहे.
या कालावधीत एमआयएम विद्यार्थी संघटनेच्या नेतेमंडळींना आपला कार्यअहवाल सादर करावयाचा आहे. तसेच एमआयएम विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन पातळीवर व शैक्षणिक स्तरावर ज्या कोणाला काम करावयाचे आहे, अशा नवीन लोकांनीही या आढावा बैठकीत सहभागी व्हावे. याबाबत अधिक कोणाला विस्तृतपणे माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांच्याशी ७७१००८६७८६ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे एमआयएम विद्यार्थी आघाडीकडून प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.