सौ. स्वाती इंगवले : ८३६९९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६, सारसोळे गाव व कुकशेत गावात धुरीकरण अभियान सातत्याने राबविण्याबाबची लेखी मागणी नवी मुंबई महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ८५ व ८६ मध्ये समाविष्ट होणाऱ्या नेरूळ सेक्टर ६, सारसोळे गाव आणि कुकशेत गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला आहे. सांयकाळी ६ नंतर घराच्या दारे-खिडक्या बंद करून घरात बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आणि रहीवाशांवर आलेली आहे. उद्यानात तसेच अन्य सार्वजनिक जागेवर, मंदीरातही बसणे अवघड झाले आहे. अगोदरच मलेरिया, डेंग्यू साथीच्या आजाराचे रूग्ण प्रभागात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहेत. साथीच्या आजारावरील रूग्ण खासगी दवाखाने व रूग्णालयात उपचार घेत असल्याने पालिका प्रशासनाला कागदोपत्री माहिती मिळत नाही. डासांचा उपद्रव वाढीस लागल्याने साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य व लोकांना जाणवणारा डासांचा त्रास पाहता आपण संबंधितांना प्रभाग ८५ व ८६ मध्ये डासांची समस्या निकाली काढण्यासाठी विशेष धुरीकरण अभियान राबविण्यासाठी निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.