आबा एसीपी : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : दिवाळीच्या पूर्वी आमच्या प्रश्नांवर मार्ग निघेल अशी अपेक्षा होती, मात्र आमचा कोणताही प्रश्न सुटला नसल्याने आम्ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी दिवाळीच्या सणात काळे कपडे घाल प्रशासनाचा निषेध नोंदवला. तसेच प्रत्येक शिक्षकांच्या घरांवर काळ्या रंगाचा कंदिल लावून आम्ही काळी दिवाळी साजरी केल्याचे व शिक्षक भारतीच्या उपाध्यक्षा नंदा कांबळे यांनी सांगितले. आमच्या मागण्यावर शिक्षण विभाग, महापालिका प्रशासनाने आता अंत पाहू नये, अन्यथा यापुढे रस्त्यावर उतरून आमचे शिक्षक आंदोलन करतील असा इशारा शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी दिला आहे.
याविषयी स्वत: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रश्नांसाठी महापालिका आयुक्त, वित्त विभागचे सचिव यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यावर त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे जाऊन आमच्या व्यथा मांडल्या असल्याची माहिती जालींदर सरोदे यांनी दिली.
मुंबई महापालिका क्षेत्रातील प्राथमिक खासगी अनुदानित शाळातील शिक्षकांनी शालेय शिक्षण विभागाच्या विरेाधात संताप व्यक्त करत काळे वस्त्र परिधान करून आपल्या घरांवर काळे कंदिल लावत काळी दिवाळी साजरी केली. शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे आमचे प्रश्न सुटत नसल्याचा आरोपही शिक्षक भारती या संघटनेच्या शिक्षकांकडून करण्यात आला.
शिक्षक भारती या शिक्षक संघटनेकडून मुंबईतील प्राथमिक शाळांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासोबत अनुदानित शाळांनाही महापालिकेच्या शाळांप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत वस्तू देण्याच्या मागणीसाठी मागील महिनाभरापासून मुंबईतील आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू आहे.