आबा एसीपी : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून तसेच साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांच्या सहकार्याने ‘एक दिवा राम मंदिरासाठी’, ‘एक दिवा श्री रामासाठी’ अशी संकल्पना पुढे घेवून येत साईभक्त महिला फाउंडेशन व प्रभाग ७६ भाजपच्या वतीने सानपाड्यात रविवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
साईभक्त महिला फाउंडेशन व साईभक्त सेवामंडळ यांनी पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून आयोजित केलेला दीपोत्सव सोहळा सानपाडा सेक्टर २ मधील खेळाच्या मैदानावर सांयकाळी ६ ते रात्री १० यादरम्यान होणार आहे. सायंकाळी ६ ते ७.३० यादरम्यान दिवाळी संध्या संगीत, रात्री ७.३० ते ८.३० यादरम्यान पाहुण्यांचे स्वागत व व्याख्यान, रात्री ८.३० ते ९ या दरम्यान विविध पारंपरिक खेळाचे आयोजन आणि रात्री ९ ते १० यादरम्यान दिपोत्सव होणार आहे. श्रीराम मंदीराची प्रतिकृती, सेल्फी पॉईंट, दिवाळी संध्या संगीत, भव्य श्री राम रांगोळी, विश्व हिन्दु परिषदेच्या व्याख्यांत्यांकडून व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाच्या माध्यमातून पांडुरंग आमले यांनी केले आहे.
सानपाडा सेक्टर २ खेळाचे मैदानावर आयोजित या दिपोत्सव कार्यक्रमात सानपाडावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी संयुक्तपणे केले आहे.