आबा एसीपी : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयोजनाखाली नवी मुंबई ब्लड सेंटर, खारघर-नवी मुंबई यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती अशोक गांडाळ यांनी दिली. वाढदिवसनिमित्ताने रविवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत नेरूळ सेक्टर १६ मधील सनशाईन हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात बीपी चेकअप, जनरल चेकअप, शुगर चेकअप, दंत तपासणी,ई.सी.जी शुगर गरजेनुसार, उंची व वजन तपासणी, स्त्री रोग तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य शिबीरासाठी डॉ. इमानदार, डॉ. निलोफर येरूळकर, डॉ. अर्चना निलेश भोंगे हे मार्गदर्शन करणार आहेत. रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर नेरूळ सेक्टर १६ येथील छत्रपती संभाजी राजे उद्यानाजवळील सेच्युरियन सोसायटीच्या ए-०६ या माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती सागर मोहिते यांनी दिली.
रक्ताचा कमी होत चाललेला साठा पाहता रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, तसेच साथीचे वाढते आजार, कोरोना महामारीचा उद्रेक या पार्श्वभूमीवर रहीवाशांनी स्वत:हून आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन समाजसेवक व पर्यावरणप्रेमी रवींद्र भगत यांनी केले आहे.