सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : भारताला ‘१९४७ साली मिळाले ते स्वातंत्र्य नसून भीक आहे, खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले’, असे बेताल वक्तव्य करुन अभिनेत्री कंगणा राणावत हिने हजारो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कंगणाचे विधान हा देशद्रोहच आहे. त्यामुळे कंगणा राणावतविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान यांनी केली आहे.
नसिम खान यांनी साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष जगदीश आमीन, मो. शरिफ खान, प्रभाकर जावकर, माया खोत आदी पदाधिकारीही उपस्थित होते.