संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : टिळक विद्यालय, सेक्टर-५, घणसोली व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक बंदी, शून्य कचरा संकल्पना व ई- वेस्ट व्यवस्थापनबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये घणसोली विभागाचे विभाग अधिकारी व उप मुख्य स्वच्छता अधिकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांना वरील विषयावर मार्गदर्शन केले. तसेच घरामध्ये कंपोस्ट पिट, कंपोस्ट बास्केट कसा करावा याबाबत माहिती दिली. यावेळी घणसोली विभागाचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके, उप मुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, मुख्याध्यापक शिंदे, उप मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक देवरस, संजय पाटील, उप स्वच्छता निरीक्षक वळवी, चौधरी, केणी, पारकर, श्रीम. साळदर सर्व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रम मध्ये प्लास्टिक बंदीची सामुहिक शपथ घेण्यात आली.