संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न मराठी कामगार सेनेची नवी मुंबई कार्यकारणी मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात जाहीर करण्यात आली.
नवी मुंबई शहर कामगार संघटक म्हणून अक्षय भोसले यांची तर सुर्यकांत गोडसे (बाबाजी), मयूर चव्हाण, दिनकर पागिरे, ईरेशा महागाव यांची उपशहर कामगार संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. बाबासाहेब (नाना) भुयेकर व आशिष चोरगे यांची बेलापूर आणि ऐरोली सचिवपदी नियुक्ती करण्यात आली
यावेळी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, मराठी कामगार सेना अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष राजकुमार पाटील, मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष आप्पासाहेब कोठूळे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, विद्यार्थी सेना शहर सचिव सुमित जाधव, शाखा अध्यक्ष मयूर कारंडे, संकेत बोडके, मनसैनिक श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.