संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस पक्षाने आघाडी घेतली असून कॉंग्रेसच्या नेरूळ सेक्टर २ मधील नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयात नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे निरीक्षक उल्हास पाटील यांनी भेट देवून संघटनात्मक कार्याचा व निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
उल्हास पाटील यांनी ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयास भेट देवून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ-जुईनगर भागातील पक्षाच्या राजकीय वाटचालीचा, कार्याचा व ताकदीचा आढावा घेतला. यावेळी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, ओबीसी सेलचे नवी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संतोष सुतार, सचिव विजय कुरकुटे, महेश भोईटे, राहूल कापडणे, राक्षे, संग्राम इंगळे, संजय शिंदे, शेलार, उत्तम पिसाळ, सुदर्शन सावंत उपस्थित होते.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली व उपस्थितांना उल्हास पाटील यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आपल्या प्रास्तविक भाषणातून नेरूळ कॉंग्रेसचा संघटनात्मक आढावा घेताना वस्तूस्थिती अवगत करून दिली. विद्या भांडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.