संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : : मनसे जुईनगर विभाग व भागवत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत सुरू असलेल्या शिवजनसंपर्क अभियानाअंतर्गत व जुईनगर – राजगड या शाखेच्या माध्यमातुन १९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत अनेक समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भाषा दिनाचे औचित्य साधून या अभियानाची सांगता करण्यात आली. सकाळी डॅा भागवत प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून मोफत दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो नागरिकांनी यावेळी आपली दंत तपासणी करून घेतली. डॉ. भागवत प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट चे डॉ. स्वप्नील भागवत व डॉ जयश्री भागवत हे स्वतः उपस्थित राहून तपासणी करून घेत होते. डॉ. स्वप्नील भागवत यांनी स्वतः नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या समस्याचे निराकरण करत होते .
२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रभर साजरा होणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कवी संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व जनहित कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सुंदर भित्तीपत्रक स्थानिक मनसे शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक ८२ चे संकेत बोडके यांनी केले होते. या भित्तीपत्रकाचे औपचारिक अनावरण कवी संमेलनाचे अध्यक्ष डॅा. श्याम चिदानंदराव मोरे, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाचे यांनी फित कापून केले. त्यानंतर नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनीही ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची कविता ऐकवून उपस्थितांची दाद मिळवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. आलेल्या कवी / कवीयित्रींच्या काही कविता ऐकत त्यांना दाद देत त्याचा उत्साह व्दिगुणीत केला. यावेळी डॉ. श्याम मोरे, मिलिंद कल्याणकर,शामराव सुतार, मंगला उदामले मॅडम, सागर सोनवणे, शलाका कोठावदे मॅडम आणि सूर्यकांत गोडसे यांनी आपल्या कविता सादर केल्या. प्रत्येक कवितेला पदाधिकारी आणि उपस्थित प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. यावेळी काही कविता भूतकाळाकडे घेऊन गेल्या तर काहींनी वर्तमान वेळ दाखवून दिली. काही कवितांमुळे डोळ्यात पाणी आले तर काही कवितांनी प्रेक्षकांना हसविले. मराठी भाषा दिवस असल्याने मराठी भाषेवरच्या काही कवितांनी वेगळीच दाद मिळवली. प्रत्येक कवी / कवियत्रीला सन्मानपत्र, शिवजनसंपर्क अभियानांतर्गत शिवप्रतिमा तसेच ‘महाराष्टातील उगवते तारे’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची पत्र भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा. श्याम मोरे, शहर सहसचिव अभिजित देसाई, म.न.वि.से.अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुमरेकर, शारीरिक सेना शहर संघटक सागर नाईकरे , चित्रपट सेना शहर संघटक किरण सावंत , मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, जनहित कक्ष शहर सचिव सूर्यकांत गोडसे, उपविभाग अध्यक्ष अजय मोरे, मंगेश जाधव, शाखा अध्यक्ष संकेत बोडके, मयूर कारंडे,पुंडलिक पाटील, म.न.वि.से. शहर सचिव सुमित जाधव, उपशाखा अध्यक्ष सुशांत घोरपडे, महाराष्ट्र सैनिक श्रीकांत माने यांच्यासह रसिकांनी हजेरी लावली.