अविनाश तावडे : Navimumbailive.com@ggmail.com
नवी मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवामध्ये समाजसेवक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, भाजप नेरूळ मंडळाध्यक्ष राजू तिकोणे, समाजसेविका सौ. उल्का राजू तिकोणे यांच्या वतीने नेरूळ सेक्टर १८ ए मधील श्री. शंकर मंदिरामध्ये भाविकांकरीता अल्पोपहार,फळे व पाणी वाटप करण्यात आले.
सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० पर्यंत २०० किलो उपवासाचे फरसाण, १०० डझन केळी, २५ किलो मौसंबी, १०० बॉक्स पाणी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त आयोजित उत्सवामध्ये नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार, युवा नेते वैभव नाईक, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, रमेश शिंदे, भरत जाधव, भोजमल पाटील, समाजसेवक भरत सकपाळ, संजय सपकाळ, रमेश नरवडे, बी.जी कुंभार, दादासाहेब पवार, स्वप्निल दौंड, दादासाहेब लोंढे, भागवत माने, वासुदेव पाटील, प्रकाश बेंद्रे, भगवान पाटील, संपत तोडकर, बाळासाहेब आंधळे, सोनबा घोलप, ओंकार कासुर्डे, ऋषिकेश भुजबळ, भरत मोरे, जालिंदर बागल, जयवंत चव्हाण, रामकुमार वर्मा, अक्षय शिरगावकर, अशोक गांडाल, नारायण पाटील, जयंत म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, खंडू कोकणे, सुरेश बोराटे, मंगेश राऊत, तानाजी एडके, दत्तात्रेय पाडेकर, राजू भूमकर, सुनील कदम, सत्यवान घाडी, पांडुरंग बेलापुरकर, दत्तात्रेय तोडे, पोपट पवार,बाजीराव धुमाळ, पलांडे काका, मोहन बने, समाजसेविका सौ. विमल गांडाल, छाया पवार, प्रमिला गिरी, सोनाली पाटील, नमन चौधरी, माया पवार, सुशीला दुबोले, सुजाता दाते उपस्थित होत्या.
स्थानिक नेरूळ व सिवूडसमधील रहीवाशी तसेच कुकशेत, नेरूळ, सारसोळे गावातील ग्रामस्थ या महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.