नवी मुंबई : सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असणाऱ्या युगपुरूष प्रतिष्ठान, नेरूळचा प्रथम वर्धापन दिवस नेरूळ सेक्टर सहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
नेरूळ सेक्टर सहामधील लोकमान्य टिळक समाजमंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास भाजपाचे युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी प्रल्हाद पाटील, दिलीप आमले, इमरान नाईक, वंचित बहूजन आघाडीचे नेते विरेंद्र लगाडे, यशवंत तांडेल, अक्षय काळे, संदीप निकम, गुरू म्हात्रे, सीमा किसवे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पंचशील समाजिक संस्था सेक्टर -६,व सेक्टर २४ यांचे सर्व पदाधिकारी व सेक्टर-६ मधील नागरिकांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभेच्छा व आशिर्वाद स्वरूपात मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.