संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष तसेच लढवय्ये कामगार नेते श्री. रविंद्र सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ठचिंतन सोहळ्याला कॉंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी व माजी ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी नगरसेविका मिरा पाटील, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार, समाजसेवक रविंद्र भगत यांच्यासह पालिकेचे अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेतील कर्मचारी आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यत नागरिकांची रविंद्र सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. दुपारी नेरूळ सेक्टर १६ मधील जीवनज्योती आशालय या अनाथाश्रमामधील मुलांना भोजन वाटप करण्यात आले. या मुलांसमवेत रविंद्र सावंत स्वत: भोजन करावयास बसले होते.
सांयकाळी वाढदिवसानिमित्त कॉंग्रेस कार्यालयासमोर जुईनगर व नेरूळमधील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बाराशेहून अधिक महिला या हळदीकुंकू समारंभात सहभागी झाल्या होत्या. यावेळी आयोजित वेशभूषा स्पर्धेत स्थानिक परिसरातील लहान बालकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. वेशभूषा स्पर्धेत पूनम साळोखे यांना प्रथम बक्षिस म्हणून सोन्याची नथ देण्यात आली, रोहिणी धिवर यांना दुसरे बक्षिस म्हणून पैठणी देण्यात आली. सौ प्रिया पुजारी ,सौ अर्चना जैन सौ मंगल कारकिले सौ सीमा वाघ सौ उर्मिला जैन सारीक धोंडे पूजा चव्हाण यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. महिलांच्या वेशभूषा स्पर्धेच्या वेळी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव श्रीमती विद्या भांडेकर, नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा गौरी रविंद्र सावंत आणि शीतल नितीन सावंत उपस्थित होत्या.
शिवजंयतीच्या दिवशी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेचे बक्षिस वितरण वाढदिवसानिमित्ताने करण्यात आले. पोवाडा स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांनाही बक्षिसे देण्यात आली. मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत चार महिन्याचा बालक असलेल्या देवांश पाटील याचा प्रथम क्रमांक आला. वाढदिवसानिमित्त कॉंग्रेस कार्यालयातून ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.