• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 25, 2022

मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही तरी नवी मुंबईच्या मूषक कामगारांना न्याय द्या : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : आज फेब्रुवारी महिन्याची २५ तारीख उलटली तरी नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. तीन दिवसांनी फेब्रुवारी महिना संपेल. महापालिका प्रशासन टेंडर, निविदा आदी तांत्रिक सबब पुढे करत आहे. ठेकेदारही गेल्या अनेक वर्षापासून या कर्मचाऱ्यांचे वेतन दोन ते तीन महिने विलंबानेच करत असतो. आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करूनही वेतन विलंबाने घेणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्रीसाहेब, आता तुम्ही तरी न्याय मिळवून द्या, अशी लेखी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

आज २५ फेब्रुवारी २०२२. नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२२ या महिन्याचे वेतन आजतागायत झालेले नाही. पालिका प्र्रशासनाकडून या विभागाशी संबंधित असणारे उपायुक्त असणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लेखी पत्र पाठवून संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. ठेकेदार कोणीही द्या पण या गरीब कामगारांचे पगार वेळेवर करा, हीच आमची भूमिका आहे. टेंडर काढणे, निविदा भरणे अथवा मुदतवाढ देणे हा प्रशासकीय कामाचा भाग आहे. फायदा असल्याशिवाय कोणताही ठेकेदार निविदा भरत नाही. वर्षानुवर्ष एकच ठेकेदार मूषक नियत्रंणचा ठेका सांभाळत आहे. कामगारांचे वेतन दोन दोन विलंबाने देणाऱ्या ठेकेदारालाच वर्षानुवर्ष मूषक नियत्रंणचा ठेका दिला जात आहे. कामगारांचे गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक शोषण होत आहे. नवी मुंबई महापालिकेला अन्य कोणी ठेकेदार भेटत नाही काय? असा प्रश्न संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.

 कामगारांच्या वेतनास विलंब करणाऱ्या ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे. आपण या कर्मचाऱ्यांची वेतनाबाबतची बॅक खाती चेक करा. मागील बारा ते तेरा वर्षात या कामगारांची वेतनाबाबत ससेहोलोपट होत असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. मूषक नियत्रंण कामगारांचे वेळेवर वेतन मिळत नाही. पालिका प्रशासनानेही सुरूवातीपासून या कामगारांना वाऱ्यावर सोडल्याने आजपर्यंत ठेकेदाराचे फावले आहे. त्यामुळेच मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन विलंबानेच होते. अन्य सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत असते.  नवीन कोणी ठेकेदार नसेल तर महापालिका प्रशासनाने अन्य कामगारांप्रमाणे याही कामगारांचा महापालिका प्रशासनाच्या वतीने महिन्याच्या तीन तारखेपर्यत पगार करावा. ठेकेदाराला पैसे महापालिका देत असतानाही कामगारांच्या वेतनास विलंब होत असल्याने महापालिका ठेकेदारांना का पोसत आहे? प्रशासकीय बाबची ढाल पुढे करून मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतनास विलंब होणे योग्य नाही. २५ तारखेपर्यत कर्मचाऱ्यांचे वेतन न होणे ही बाब नवी मुंबई महापालिका प्रशासनाला भूषणावह नाही. तरी मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करणे आणि ठेकेदाराकडून मी महिन्याच्या पाच-सात तारखेलाच वेतन देईल असे प्रतिज्ञापत्रावर लिहून घेणे आवश्यक आहे. यापुढे मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनास  विलंब झाल्यास ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून तशा आशयाची वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करावी आणि वेतन विलंब करणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराला पुन्हा कोणतेही कंत्राट मिळणार नाही अशी तजवीज आपण पालिका प्रशासनात करावी. निविदा हा प्रकार चालूच राहील, पण तातडीने आपण २५ फेब्रुवारीपर्यत वेतनास झालेला विलंब व त्यामुळे जनसामान्यांत महापालिका प्रशासनाची मलिन होत असलेली प्रतिमा ध्यानात घेवून नवी मुंबई महापालिका प्रशासनातील संबंधितांना तातडीने मूषक नियत्रंण विभागाचे वेतन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Previous Post

आज २४ फेब्रुवारी. आता तरी, मूषक नियत्रंण कामगारांचे पगार करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

कामगार नेते रविंद्र सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post
कामगार नेते रविंद्र सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कामगार नेते रविंद्र सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मनसेच्या जुईनगर विभागातर्फे नागरिकांसाठी दंत चिकित्सा शिबीर व काव्य संमेलन उत्साहात

मनसेच्या जुईनगर विभागातर्फे नागरिकांसाठी दंत चिकित्सा शिबीर व काव्य संमेलन उत्साहात

महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकर मंदीरात अल्पोपहार,फळे व पाणी वाटप

महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकर मंदीरात अल्पोपहार,फळे व पाणी वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com