नवी मुंबई : आज २४ फेब्रुवारी, मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापि झाले नसल्याचे लेखी निवेदनातून समासजेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून देताना आयुक्तसाहेब, आता तरी मूषक नियत्रंण कामगारांचे पगार करा, असे साकडे घातले आहे.
आज २४ फेब्रुवारी २०२२. पालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२२ या महिन्याचे वेतन आजतागायत झालेले नाही. पालिका प्र्रशासनाकडून या विभागाशी संबंधित असणारे उपायुक्त असणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लेखी पत्र पाठवून संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. ठेकेदार कोणीही द्या पण या गरीब कामगारांचे पगार वेळेवर करा, हीच आमची भूमिका आहे. टेंडर काढणे, निविदा भरणे अथवा मुदतवाढ देणे हा प्रशासकीय कामाचा भाग आहे. फायदा असल्याशिवाय कोणताही ठेकेदार निविदा भरत नाही. वर्षानुवर्ष एकच ठेकेदार मूषक नियत्रंणचा ठेका सांभाळत आहे. आपण या कर्मचाऱ्यांची वेतनाबाबतची बॅक खाती चेक करा. मागील बारा ते तेरा वर्षात या कामगारांची वेतनाबाबत ससेहोलोपट होत असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. मूषक नियत्रंण कामगारांचे वेळेवर वेतन मिळत नाही. पालिका प्रशासनानेही सुरूवातीपासून या कामगारांना वाऱ्यावर सोडल्याने आजपर्यंत ठेकेदाराचे फावले आहे. त्यामुळेच मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन विलंबानेच होते. अन्य सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत असते. प्रशासकीय बाबची ढाल पुढे करून मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतनास विलंब होणे योग्य नाही. २४ तारखेपर्यत कर्मचाऱ्यांचे वेतन न होणे ही बाब महापालिका प्रशासनाला भूषणावह नाही. तरी मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन वेळवर करणे आणि ठेकेदाराकडून मी महिन्याच्या पाच-सात तारखेलाच वेतन देईल असे प्रतिज्ञापत्रावर लिहून घेणे आवश्यक आहे. यापुढे मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब झाल्यास ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून तशा आशयाची वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करावी आणि वेतन विलंब करणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराला पुन्हा कोणतेही कंत्राट मिळणार नाही अशी तजवीज आपण पालिका प्रशासनात करावी. निविदा हा प्रकार चालूच राहील, पण तातडीने आपण संबंधित विभागाला आजची २४ फेब्रुवारीपर्यत वेतनास झालेला विलंब व त्यामुळे जनसामान्यांत महापालिका प्रशासनाची मलिन होत असलेली प्रतिमा ध्यानात घेवून महापालिका प्रशासनातील संबंधितांना तातडीने मूषक नियत्रंण विभागाचे वेतन देण्याचे निर्देश देण्याची मागणी समासजेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.