नवी मुंबई : अवघ्या २५ दिवसाला आलेला पावसाळा पाहता कोपरखैराणे नोडमधील प्रभाग ४२ येथील कोपरखैराणे सेक्टर २२,२३,१६, १७ मधील काही भाग या परिसरातील नागरी समस्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
कोपरखैराणे नोडमधील प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर २२, २३, १६ आणि १७ मधील काही भाग या परिसराचा समावेश होत आहे. पावसाळा आता अवघ्या २५ दिवसावर आला आहे. हवामानातील बदल पाहता अवकाळी पाऊसाचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ४२ मधील नागरी समस्यांचे निवारण होणे आवश्यक आहे. पावसाळ्यात वाढते साथीचे आजार पाहता प्रभाग ४२ मधील समस्यांचे निवारण लवकरात लवकर व्हावे यासाठी निवेदन सादर करत असल्याचे समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
पावसाळ्यात धुरीकरण बंद असते. याच कालावधीत साथीचे आजार वाढीस लागतात. त्यामुळे या २५ दिवसामध्ये महापालिका प्रशासनाने धुरीकरण व्यापक प्रमाणावर सातत्याने करताना केवळ बाह्य भागात नाही तर प्रत्येक सोसायटीच्या अंर्तगत भागातही धुरीकरण करण्यात यावे. मल:निस्सारण वाहिन्या पावसाळ्यात तुंबल्यामुळे सांडपाणी अनेकदा रस्त्यावर येत असते. त्यामुळे आता कालावधी पाहता कोपरखैराणे सेक्टर २२, २३, १६ आणि १७चा काही भाग या परिसरातील बाह्य भागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्यामध्ये तळापासून चोकअप काढण्यात यावा. जेणेकरून पावसाळ्यात मल:निसस्सारण वाहिन्या चोकअप होवून सांडपाणी बाहेर येणार नाहीत. पावसाळ्यात साथीच्या आजारांमध्ये लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा समावेश आहे. हा आजार उंदरामुळे होतो. त्यामुळे प्रभागात या २५ दिवसांमध्ये मूषक नियत्रंक मोहीम व्यापक प्रमाणावर राबविण्यात यावी. प्रभागात पाहणी अभियान राबवून ज्या ज्या ठिकाणी अंर्तगत व बाह्य रस्त्यावर खड्डे असतील, ते बुजविण्यात यावे. जेणेकरून खड्ड्यामध्ये पाणी साचणार नाही. प्रभागात पाहणी अभियान राबवून सर्व पथदिव्यांची पाहणी करण्यात यावी. पथदिव्याच्या वायरी, केबल्स बाहेर असतील, धोकादायक अवस्थेत असतील, त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. नादुरूस्त पथदिव्यांची दुरूस्ती करण्यात यावी. पावसाळ्यात ठिसूळ फांद्या पडून जिवितहानी अथवा झाडाखाली उभ्या असणाऱ्या वाहनांचे नुकसान होवू शकते. त्यामुळे झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी या दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावी. पावसाळ्यात साथीचे आजार वाढत असल्याने रहीवाशांसाठी आरोग्य विभागाचे मार्गदर्शन शिबिर घ्यावे. जेणेकरून पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांची जनतेला माहिती होईल. त्यामुळे जनजागृतीसाठी प्रभाग ४२ मध्ये जनजागृती अभियान राबवावे. भित्तीपत्रके लावावीत. माहितीपर मार्गदर्शक पुस्तिका घराघरात वितरीत करावी. प्रभाग ४२ मधील जनतेसाठी पावसाळ्यापूर्वी या नागरी समस्यांचे लवकरात लवकर निवारण व्हावे यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.