संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार येथील तीन विद्युत सबस्टेशनची दुरावस्था दूर करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. यावेळी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना भांडेकर यांच्यासमवेत कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत व नेरूळ सेक्टर चारमधील रहीवाशीही शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
नेरूळ सेक्टर चार परिसरात महावितरणची तीन सबस्टेशन आहेत. या सबस्टेशनच्या माध्यमातून सुविधा मिळत असल्या तरी तेथील बकालपणा, दुरावस्था व अन्य समस्या पाहता सबस्टेशनमुळे स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. सबस्टेशनचे दरवाजे तुटलेले आहेत. संध्याकाळच्या वेळी मद्यपि सबस्टेशनच्या आवारात बसतात. तसेच गर्दुले या सबस्टेशनमध्ये बसलेले असतात. युवक मुले-मुलीही या सबस्टेशनमध्ये बसलेले पहावयास मिळतात. आपण स्वत: या ठिकाणी पाहणी केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य समजून येईल. या ठिकाणी दुर्घटना घडण्याचीही भीती आहे. आपण सबस्टेशनची समस्या दूर करून तेथील दुरावस्था पर्यायाने आलेला बकालपणा संपविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महावितरणकडे केली आहे. शिष्टमंडळात सहभागी झालेले कामगार नेते रविंद्र सावंत, नेरूळ सेक्टर चारमधील ज्येष्ठ नागरिक अशोक महाजन, सीसीए कल्ब सेक्टर चार चे अध्यक्ष इंदरसिंग ठाकूर, पाम बीच सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन रमेश सिंग,म डी.एल.सिंग आदींनी विद्युत उपकेंद्राबाबतच्या समस्या कथन करत समस्येचे गांभीर्य महावितरणच्या निदर्शनास आणून देण्याचा यावेळी प्रयत्न केला.
00000000000000000000000000000000 000000000000000000000000000000000000
नवी मुंबई लाइव्ह. कॉम कार्यालय : गोदावरी सोसायटी, शॉप क्रं २, प्लॉट क्रं ३०७/३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प), नवी मुंबई, संपर्क : ८३६९९२४६४६