अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनामध्ये विविध संवर्गात काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच ठोक मानधन व कंत्राटी संवर्गातील
कर्मचारी यांच्या समस्यांबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या बैठकीत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी ४३ समस्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाशी बोलताना कामगारांचे समस्यांचे लवकरच निवारण करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त अभिजित बांगर यांनी कामगार नेते रविंद्र सावंत यांना दिले.
या शिष्टमंडळात कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासमवेत दोस्ती वाहन विभागाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, फायर ब्रिगेडचे कर्मचारी अधिकारी तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच जे कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. बैठकीत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कायम कर्मचारी अधिकारी, ठोक मानधनावरील कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, उपस्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, घंटागाडीवरील सुपरवायझर, शिक्षण विभागातील बहुउद्देशीय कर्मचारी, वाशी हॉस्पिटलमधील कक्ष सेवक कक्ष सेविका ठोक मानधनावरील शिक्षक प्राथमिक व माध्यमिक विभाग यासह अन्य समस्या कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना कथन केल्या. समस्या समजून घेतल्यावर समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले.
कामगार नेते रविंद्र सावंत व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेत मांडलेल्या ४३ समस्या:
१) नागरी आरोग्य केंद्रात दोन किंवा अधिक सफाई कर्मचारी /बहुउद्देशिय कर्मचारी आवश्यक आहेत. तेथे नियुक्त केलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती मालमत्ता विभागाने नियमित केलेली नाही. गेली २/३ वर्षे काम करत असलेल्या या बहुउद्देशिय कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी कंत्राटी तत्वावर नियुक्ती मालमत्ता विभाग किंवा आरोग्य विभागाने विनाविलंब करावी.
२) क्षेत्रिय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही क्षेत्रिय भत्ता आहे, तो आठशे रुपये आहे. सातत्याने होणारी पेट्रोल दरवाढ आणि इतर सर्व महागाई पाहता तो कमीत कमी ५४०० रूपये मासिक इतका मिळावा.
३) कोपरखैरणे सेक्टर ११ भूखंड क्रमांक १४ क्षेत्रफळ चार हजार चौरस मीटर या भूखंडावर मनपा कामगारांसाठी निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
४) कक्ष सेवक, कक्ष सेविका या संवर्गातील कर्मचारी यांच्या समस्याबाबत या आधी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्यात यावी.
५) वायरमन /प्लंबर/फिटर/जोडारी, या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित)नियम २००९ नुसार ग्रेड पे २४०० पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा.
६) श्री. धनंजय चंद्रकांत खरे (उपस्वच्छता निरीक्षक) यांना डावलून त्यांच्यापेक्षा निमम स्तरावरील उप स्वच्छता निरीक्षकांना पदोन्नती करता पात्र ठरवण्यात आल्याने त्यांचेवर झालेला अन्याय दूर करावा.
७) मयत कर्मचारी विशाल बाबुराव साळवे आरोग्यसेवक (एमपीडब्ल्यू) यांच्या जागेवर त्यांची पत्नी श्रीमती नलिनी विशाल साळवे यांना नोकरी देण्यात यावी.
८) राष्ट्रीय क्षयरोग धुरीकरण कार्यक्रम(NTEP) अंतर्गत कार्यरत करार तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेतर्फे ठोक मानधनात वाढ करण्यात यावी.
९) क्ष-किरण अटेंडंट या पदाकरिता आकृतीबंधमध्ये असणारी बारावी विज्ञान शाखा उउत्तीर्ण व मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी पदवी व पदविका उत्तीर्ण ही शैक्षणिक अहर्ता शिथिल करण्यात यावी.
१०) सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या समस्याचे निवेदन देण्यात आलेले आहे, कृपया कार्यवाही व्हावी.
११) माध्यमिक शिक्षक यांच्या समस्या नियमानुसार बदली धोरणाची अंमलबजावणी करणेबाबत, तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेकडे नाही. याबाबत धोरणात्मक निर्णय घेवून अंमलबजावणी करावी.
१२) ठोक मानधनावर काम करणारे उप स्वच्छता निरीक्षक तेजस ताटे यांचा काही महिन्यापूर्वी कामावरून घरी येताना अपघात झाला होता. अपघातांमध्ये डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन ते गेल्या कित्येक दिवसांपासून घरीच आहेत. उपचार घेत आहेत. पण प्रशासन विभागाने त्यांची साधी विचारपूसही केली नाही, त्यांना आजतागायत कोणतीही आजारपणाची रजा मिळाली नाही, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभाग असा दूजाभाव करत आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा.
१३) ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन, सुट्ट्या, इएसआय देण्यात यावे.
नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारांच्या काही मागण्या व महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे
१४) ड्रायव्हरर ऑपरेटर हे पद १००% पदोन्नतीने भरून घेणे बाबत कार्यवाही व्हावी.
१५) २००७ च्या भरतीचे कर्मचारी यांची आश्वासित प्रगति योजना (टाइमबॉण्ड ) पॉलिसी लागू करण्यात यावी.
१६) वाहनचालक यांची ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी १००% प्रमाणे रिक्त पदावर पदोन्नती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.
१७) वाहनचालकांचा ६ महिन्याचा अग्निशामकचा बेसिक कोर्स पूर्ण करुन घेण्यात यावा . यामुळे अग्निशमन दल अजून सक्षम होईल.
१८) रिस्क पे आणि कॉल पे मिळणेबाबत कार्यवाही व्हावी.
१९) सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अतिकालीक भत्ता (ओव्हर टाइम) मिळावा.
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारांच्या काही मागण्या व महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :-
२०) वैद्यकीय अधिकारी/ अपघात वैद्यकीय अधिकारी यांना आश्वासित वेतनवाढ मिळावी म्हणून सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या पदोन्नतीसाठीच्या अर्हतेत बदल करुन ते नगरविकास विभागाद्वारे मंजुरी मिळविणे आवश्यक आहे. उपरोक्त नस्ती आजही प्रलंबित आहे. कृपया यावर तातडीने कार्यवाही व्हावी.
२१) नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना पूर्णकाल क्षेत्रिय पर्यवेक्षण असल्याने या संवर्गासाठी वाहन उपलब्ध करण्यात यावे.
२२) नागरी आरोग्य केंद्रासाठी पूर्णकाल आयुष कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देण्यात यावा.
परिवहन सेवेतील ठोक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या
२३) २०१०च्या महासभेच्या ठरावानुसार ठोक मानधनावर काम करणारे वाहन आणि चालक यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यहावी.
२४) ठोक मानधनावर कार्यरत असणारे चालक व वाहक यांची सेवा कायमस्वरूपी करण्यात यावी.
२५) ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या चालक व वाहकांना त्यांच्या हक्काच्या रजा व आजारपणामुळे मिळणाऱ्या रजा भरपगारी करण्यात याव्या.
२६) परिवहन विभागातील कंत्राटी कामगारांचा ईएसआय व पीएफ ठेकेदार वेळेवर भरत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. बिल देण्यापूर्वी मागील पीएफ व ईएसआय भरणा केल्याची खातरजमा करण्यात यावी.
२७) परिवहन विभागातील कंत्राटी संवर्गातील सफाई कामगार यांना कोविड भत्ता आजतागायत मिळालेला नाही. कोविड काळात कोरोना रूग्णवाहिका बनलेल्या बसेसची सफाई व स्वच्छता केलेली आहे., त्यांच्या हक्काचा कोविड भत्ता त्यांना तात्काळ देण्यात यावा.,
२८) परिवहन विभागातील ठोक मानधनावरील व रोजंदारीवर कार्यरत असणारे चालक-वाहक यांनाही कोविड भत्ता देण्यात यावा.
२९) रोजंदारीवर काम करणाऱ्या वाहक व चालकांना पीएफ व ईएसआय सुविधा देण्यात यावी.
३०) ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची विभाग निहाय चौकशी सुरू आहे. परंतु संबंधित चौकशी समिती गठीतच झालेली नाही. त्यामुळे या चौकशांना विलंब होत आहे. या प्रकरणांची लवकरात लवकर चौकशी करून प्रकरणे निकाली काढावीत.
३१) ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या चालकांना कोणतीही सुविधा मिळत नाही. त्यांचा अपघात झाल्यावर खर्चाची जबाबदारी कोणी घेत नाही. या कर्मचाऱ्यां ईएसआय सुविधा मिळणे आवश्यक आहे.
३२) परिवहन विभागातील हे चालक आता निवृत्तीला आलेले आहे. त्याजागी ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या वाहकांची वर्णी लावावी.
३३) ठोक मानधनावर काम करणाऱ्या सहाय्यक परिचारिका (एएनएम) व स्टाफ नर्स यांना १८ ते २० हजारावर काम करावे लागते व नव्याने नियुक्त परिचारिकांना अधिक वेतन मिळते. हा दुजाभाव संपुष्ठात संबंधित परिचारिकांना समान वेतन देण्यात यावे. कोविड काळात ठोक मानधनावरील परिचारिकांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
ए.जी इन्वायरो प्रा.लि.चे पर्यवेक्षकांच्या समस्याबाबत
३४) या ठेकेदाराच्या माध्यमातून पालिका प्रशासनात कार्यरत असणाऱ्या पर्यवेक्षकांनी कोरोना काळात जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावलेले आहे. या कर्मचाऱ्यांना आजतागायत कोविड भत्ता मिळालेला नाही. तरी तो लवकरात लवकर देण्यात यावा.
३५) पर्यवेक्षकांना पालिका प्रशासनाकडून आजतागायत वेतनवाढीतील फरक (एरियस) देण्यात आलेला नाही. त्याची चौकशी करून तो तात्काळ देण्याचे संबंधितांना निर्देश देण्यात यावे.
३६) पर्यवेक्षकांना समान कामाला समान वेतन या नियमाप्रमाणेवेतन लागू करण्यात यावा.
३७) शिक्षण विभागातील बहूउद्देशिय कंत्राटी कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही. पीएफही वेळेवर भरला जात नाही. ईएसआय सुविधा उपलब्ध होत नाही. एरियस आजतागायत मिळालेला नाही. मे. सिध्दीविनायक प्रा. लि. या ठेकेदाराला कामगारांचे शोषण करत असल्याने काळ्या यादीत टाकण्यात यावे. या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ताही मिळालेला नाही. तो देण्यात यावा.
३८) महापालिका प्रशासनात कंत्राटी व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी महापालिका प्रशासनाने पाच लाख रुपयांपर्यतचा कॅशलेस विमा उपलब्ध करून देण्यात यावा.
३९) महापालिका प्रशासनातील ठोक मानधनावरील तसेच अन्य वाहनचालकांना कामाच्या निर्धारित वेळेएवजी अधिक वेळ कामावर थांबावे लागत असल्याने त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अतिरिक्त वेळेतील कामाचा ओव्हरटाईम देण्यात यावा.
४०) महापालिकेचे जुने मुख्यालय, प्रथमन संदर्भ रुग्णालय, ऐरोली, नेरूळ, बेलापुरमधील माता बाल रुग्णालयातील वाहन चालक कक्षातील दुरावस्था संपुष्ठात येवून वाहनचालकांची समस्या संपुष्ठात आणावी. वाहन चालकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४१) पालिका प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नव्याने ओळखपत्र वितरीत करण्यात यावे.
४२) महापालिका प्रशासनात रिक्त असलेली उपायुक्त या संवर्गातील पदे सरळ सेवेने विनाविलंब भरण्यात यावी.
४३) निवृत्त होणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीच्याच दिवशी सर्व रक्कम मिळावा, त्यासाठी विशेष अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करून स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा.