नवी मुंबई : सोमवार, दि. ३० मे रोजी श्री शनि जयंतीनिमित्त श्रीशनि महाराजांची महापुजा, महाअभिषेक, महायज्ञाचे कुकशेत गावात आयोजन करण्यात आले आहे. कुकशेत गावचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईच्या राजकारणात ओळखले जाणारे सुरज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १ ते ५ या वेळेत शनि महापुजा, महाअभिषेक व शनि महात्म्याचे पठण होणार आहे. सांयकाळी ५ ते ६ पूर्णाहूती महानैवेद्य, महाआरती, सांयकाळी ६ ते १० दर्शन व महाप्रसाद, सांयकाळी ७ ते ८ या वेळेत अशोकबुवा म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, रुपेश सुर्वे यांचे भजन, सांयकाळी ८ ते १० साटमबुवा यांचे भजन, तालसुर साधना मंडळ असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जय गजानन मित्र मंडळ, कुकशेतचे समस्त ग्रामस्थ मित्र मंडळ, कुकशेत महिला बचत गट यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले असून शनि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.