सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
पनवेल : संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानास शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडोपाड्यात सरकारी योजनेची माहिती तळागाळातील नागरिकांना देऊन त्यांना लाभ कसा घेता येईल तसेच पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ व ‘घर तिथे शिवसैनिक’ अशा संकल्पास सुरुवात करण्यात आली होती. या शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख खासदार राजन विचारे यांना उरण, कर्जत, पनवेल, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड या विधानसभेची जबाबदारी देण्यात आली होती. या अभियानाच्या चौथ्या दिवशी महाड येथून सुरुवात केली. त्यामध्ये महाड तालुक्याला विशेष महत्त्व देऊन खासदार राजन विचारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात सभा संपन्न झाली. महाड, पोलादपूर, माणगाव या विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्फत मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांबद्दल त्यांचे कौतुक केले. तळागाळातील गावापर्यंत विकासाची गंगा पोहचवायची असेल तर आपल्या लोकप्रतिनिधीचे हात बळकट करणे तितकेच गरजेचे आहे. तेव्हाच सर्वसामान्य घटकाचा विकास होईल असे मत या वेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी संपर्कप्रमुख सदानंद थरवळे, जिल्हाप्रमुख अनिल नवघने, आमदार भरत गोगावले, तालुका संपर्कप्रमुख किशोर जाधव, विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्ष सोनाली गायकवाड, शहराध्यक्ष सुरेश पवार, युवासेनेचे श्री. विकास गोगावले उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब राष्ट्रीय स्मारकास भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन केले व त्यांच्या विचारावर आपल्या सर्वांना चालण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आव्हान तेथील शिवसैनिकांना दिले. माणगाव व श्रीवर्धन येथील कुणबी समाज विकास मंडळ रंगमंच व म्हसळा येथील पाचगाव आगरी समाज या सभागृहातही शिवसेनेची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी शिवसेना पक्षांमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या समस्त नागरिकांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवसंपर्क अभियान दरम्यान प्रत्येक खेडोपाड्यात कामाचे भूमिपूजन, उद्घाटन, खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच महाड येथील महानगर गॅस लिमिटेड व सी. एस. आर. योजने अंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत दिव्यांग सहाय्य साहित्याच वाटप खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग व्यक्ती हा एक समाजाचा एक अभिन्न भाग आहे. दिव्यांग व्यक्तीची समस्या त्यांची नसून संपूर्ण समाजाची ही समस्या आहे. समाजातील वंचित घटक असून त्यांना केवळ सहानुभूती नको त्यांच्या गरजेनुसार आपणही सहाय्यभूत झाले पाहिजे असा विश्वास तेथील उपस्थितांना दिला.
यावेळी ४२ इलेक्ट्रिक सायकल, ७० तीन चाकी सायकल, ८० काठ्या व कुबड्या, ८२ कृत्रिम हात व पाय, २०० श्रवणयंत्रे व ७० व्हीलचेअर अशी विविध सहाय्यक उपकरणांचे वाटप केले.
००००००००००००००००००००००००००००००००००० ००००००००००००००००००००००
कार्यालय : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई : संपर्क : ८३६९९२४६४६, Navimumbailive.com@gmail.com