नवी मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होत असून सभागृहातील संख्याबळानुसार त्यापैकी सहा जागा महाविकास आघाडीच्या तर उर्वरित ४ जागा भाजपच्या पदरात पडणार आहेत. महाराष्ट्रातील कोळी समाजाची लोकसंख्या ८० लाखांहून अधिक आहे. शिवसेनेने यापूर्वी अनंत तरेंच्या माध्यमातून कोळी समाजाचा मान-सन्मान केलेला आहे, भाजपने रमेश पाटील यांना विधान परिषदेवर पाठवून कोळी समाजाला प्रतिनिधीत्व देण्यास प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या विधान परिषद निवडणूकीच्या माध्यमातून कोळी समाजाला कितपत न्याय देतात याकडे राज्यातील ८० लाख कोळी समाजाच्या नजरा आता शरद पवारांच्या निर्णयाकडे खिळल्या आहेत.
शरद पवार हे मराठा समाजाचे नेते म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी सर्व धर्मियांबाबत उल्लेखनीय कार्य केलेले आहे. साडे बारा टक्के योजना अस्तित्वात आणताना नवी मुंबई पट्टीतील आगरी-कोळी समाजासाठी भरीव योगदान दिले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी या श्रमिक घटकांला निवासी सुविधा कोपरखैराणे, नेरूळ, ऐरोली, घणसोली परिसरात अत्यल्प दरात उपलब्ध करून दिलेली आहे. महापालिका मुख्यालय ते मोरबे धरण सर्व कमी किंमतीत नवी मुंबईकरांना केवळ शरद पवारांमुळेच सवलतीच्या दरात उपलब्ध झालेले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ८० लाखाहून अधिक लोकसंख्येने कोळी समाज विखुरलेला आहे. शिवसेनेने अनंत तरेंच्या माध्यमातून सातत्याने कोळी समाजाचा यथोचित मान-सन्मान गेली अनेक वर्षे सातत्याने केलेला आहे. भाजपनेदेखील रमेश पाटील यांना विधान परिषदेवर पाठवून कोळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुप्रिमो शरद पवार अनेक जाती-जमातींच्या नेतृत्वाला ताकद देण्याचे कार्य केलेले आहे. कोळी समाजालाही ते या विधान परिषद निवडणूकीत नक्कीच न्याय देतील असा आशावाद कोळी समाजातील घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहरामध्ये कोळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चंदू पाटील व नामदेव भगत हे दोन मातब्बर उपलब्ध आहे. कोळी समाजासाठी दोघांचेही भरीव स्वरूपातील उल्लेखनीय कार्य आहे. चंदू पाटील कोळी समाज सेलचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. शरद पवार समर्थंक आहे, तर कोळी समाजातील दुसरे मातब्बर प्रस्थ नामदेव भगत हे प्रदेश स्तरावर गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले नेतृत्व आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशी नामदेव भगत यांची वाटचाल राहीलेली आहे. सिडको संचालकपदावरही त्यांनी गेली अनेक वर्षे संचालक म्हणून कार्य केलेले आहे. स्वत: कमी शिक्षण घेतलेले असले तरी गोरगरीबांच्या मुलांना अत्यल्प दरात चांगल्या दर्जाचे बालवाडी ते पदवीपर्यत शिक्षण मिळावे यासाठी नामदेव भगत गेल्या अनेक वर्षापासून स्वत: शाळा व महाविद्यालय चालवित आहेत. नवी मुंबई विकसित होत असल्याने बाहेरून येणाऱ्या समाजाला येथील स्थानिक आगरी-कोळी समाजाची, प्रकल्पग्रस्तांची ओळख व्हावी, त्यांच्या चालीरिती समजाव्या, नवी मुंबई वसविण्यात त्यांचे योगदान समजावे, येथील जुन्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे नामदेव भगत यांच्याकडून आगरीकोळी महोत्सवाचे व्यापक प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. सिडकोच्या माध्यमातून आगरी-कोळी भवनची, भूमीपुत्र भवनची उभारणी करण्यात नामदेव भगत यांचे योगदान नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे. राजकारणात गेली साडेतीन दशके सक्रिय असणारे नामदेव भगत हे शैक्षणिक, धार्मिक, सहकार, सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. महापालिकेच्या दुसऱ्या सभागृहापासून महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांनी सांभाळले आहे. शरद पवारांनी विधान परिषद निवडणूकीत कोळी समाजाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून न्याय द्यावा, प्रतिनिधीत्व द्यावे अशी मागणी राज्यातील विविध कोळी संघटनांकडून आता करण्यात येत आहे. शिवसेना, भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेस कोळी समाजाला कितपत न्याय देते हे आता पूर्णपणे शरद पवारांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.