अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सौजन्याने आणि युगांतर मित्र मंडळाच्या वतीने नेरुळ येथील श्री झोटिंगदेव बामणदेव मैदान परिसरात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आले, आतापर्यंत मंडळाच्या वतीने ५०० हुन अधिक झाड लावून त्यांचे संवर्धन करत असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली.
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आणि हवेतील प्राणवायुचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी या पावसाळी कालावधीत प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भगत यांनी केले. वृक्षारोपण केलेल्या सर्व झाडांच्या संवर्धनाची आणि संगोपनाची जबाबदारी युगांतर मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी घेतली आहे. आज मंडळाच्या वतीने कडू लिंब, चिकू, जांभूळ, पेरू, केळी सुपारी, बांबू,अशी २० झाडे लावण्यात आली.
वृक्षारोपण प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र भगत, दर्शन म्हात्रे,नंदेश भगत,श्रीकांत ठाकूर, मयूर पवार,जयु पवार,दिंगंबर गिरी,योगु म्हात्रे, मंगेश कदम उपस्थित होते.