अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारी आता पुन्हा सुरू झालेली आहे. कोरोना संसर्गाचे रूग्ण आकडेवारीही वाढू लागलेली आहे. आजवर आलेल्या प्रत्येक लाटेचा सामना नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या मदतीने नवी मुंबईकरांनी यशस्वीपणे सामना केलेला आहे. कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून प्रतीदिन कोव्हिड भत्ता देण्यात आलेला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कार्य केलेले आहे. त्यात कोणताही खंड पडला नाही. तथापि कोरोना महामारीमध्ये काम करूनही प्रशासनाकडून आजतागायत त्यांना एक रूपायाही कोव्हिड भत्ता देण्यात आलेला नाही. याप्रकरणी चौकशी करुन मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना तातडीने कोव्हिड भत्ता देण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे केली आहे.