अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग ३४ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर सहा, आठ व दहामधील पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून नवी मुंबई शहरातील प्रभाग ३४ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर सहा, आठ व दहामधील पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्यासाठी संदीप खांडगेपाटील राज्य सरकारकडे व नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
एकीकडे पूर्वीच्या तुलनेत पाणी सकाळी व संध्याकाळी येणाऱ्या वेळेतही पालिका प्रशासनाकडून कपात करण्यात आलेली आहे. दुसरीकडे पूर्वीच्या तुलनेत पाणी कमी दाबाने येत असल्याने गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्याही भरून होत नाही. स्वमालकीचे मोरबे धरण असणाऱ्या नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सकाळी उठल्यावर प्रभाग ३४ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर सहा, आठ व दहामधील रहीवाशांना वासुदेवाची भुपाळी नाही तर ‘पाणी कम आ रहा है, चला जायेगा, भर के रखो’ असे गेल्या काही महिन्यापासून सोसायटीच्या वॉचमनची घोषणा ऐकण्याची सवय झाली आहे. प्रभाग ३४ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर सहा, आठ व दहा परिसरात पाण्याच्या वेळेत झालेली कपात संपुष्ठात आणावी व पाण्याचा दाब पूर्ववत करून कमी दाबाची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी राज्य सरकारकडे व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.a