नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरखैराणे नोडमधील प्रभाग १९ मधील नागरी कामांची पाहणी करण्याची लेखी मागणी श्रीमती सुनिता हांडेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडेे केली आहे.
पावसाळा आता अवघ्या काही तासावर आलेला आहे. पावसाळापूर्व कामे पालिका प्रशासनाने वेळेवर करावीत यासाठी यापूर्वीच पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून सतत पाठपुरावाही केलेला आहे. महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६,२२,२३ १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. या पाहणी अभियानामध्ये प्रभाग १९ मधील सर्वच गटारांची तळापासून सफाई झालेली आहे का?, प्रभाग १९ मधील रस्त्यावरील तसेच अंर्तगत मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई झालेली आहे का?, प्रभाग 19 मधील आतील व बाहेरील रस्त्यावरील, पदपथावरील, सार्वजनिक ठिकाणावरील वृक्षछाटणी झालेली आहे का?, प्रभाग 19 मधील सर्वच पथदिवे सुस्थितीत आहे का? पुरेसा प्रकाश देतात का?, प्रभाग १९ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यांची डागडूजी झालेली आहे का?, प्रभाग १९ मध्ये साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन अभियान राबविण्यास सुरूवात झाली का?, प्रभाग 19 मधील पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकणेविषयी कितपत नियोजन झाले आहे?, या सर्वांबाबत कितपत कार्यवाही झालेली आहे, याची शहनिशा करता येईल. पावसाळ्यात जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी समस्यांचे निवारण व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहोत. पालिका प्रशासनाचेही करदात्या नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे. प्रभाग १९ मध्ये पावसाळी पूर्व कामांची झालेल्या पाहणी विषयी लवकरात लवकर पाहणी अभियान आयोजित करण्याची मागणी श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.