अनंतकुमार गवई
नवी मुंबई : अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरूळ गावात निर्माण करण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन रविवार, दि. ३ जुलै रोजी सांयकाळी ६.३० वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार आहे.
नेरूळ गावातील नागरी आरोग्य केंद्राजवळ ही व्यायामशाळा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी सिडको संचालक नामदेव भगत यांच्या संकल्पनेतुन, पुढाकाराने अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने या व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री, माथाडी नेते शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा निरीक्षक प्रशांत पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नामदेव भगत यांनी केले आहे.