अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरीत जावून विठ्ठलाचे दर्शन घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही. नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहामधील रहीवाशांना तसेच सारसोळे गाव व कुकशेत गावातील ग्रामस्थांसाठी भाजपचे युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी नेरूळ सेक्टर सहामध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये हिमालय व वरूणा सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या मैदानावर सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हा विठ्ठल दर्शनाचा सोहळा संपन्न होणार आहे.
सकाळी ७ वाजता पांडुरंगाच्या मुर्तीची विधीवत पुजा व अभिषेक, सकाळी ८ ते रात्री १० वाजता विठ्ठल दर्शन व फराळ वाटप, सांयकाळी ६ ते १० मध्ये सुमधूर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर ६,८ व १०च्या रहीवाशांनी तसेच सारसोळे व कुकशेतच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने विठ्ठल दर्शन सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक सुरज पाटील व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.