नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १० स्टेशन रोडवर वृंदावन सोसायटीसमोरील खड्डे बुजविण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बेलापुर विधानसभा उपाध्यक्ष अजय सुपेकर यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
वृदांवन सोसायटीसमोरील स्टेशन रोडवर खड्डे पडले आहेत. येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना या खड्ड्यातून वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडते. या खड्यात साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. त्यातच निवेदनामध्ये ठाण्यात तीनच दिवसापूर्वी खड्यामुळे एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला असल्याचे स्मरण निवेदनातून मनपा नेरूळ विभाग अधिकाऱ्यांना करून देताना तातडीने हे खड्डे बुजविण्याची मागणी अजय सुपेकर यांनी केली आहे.