अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना तातडीने कोव्हिड भत्ता उपलब्ध करुन देण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून (शुक्रवार, दि. ८ जुलै ) करताना सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला आहे. मग याच मूषक नियत्रंण कामगारांवर प्रशासन अन्याय का करत आहे? या कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळणार कधी असा प्रश्न संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे.
मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन, राज्य सरकार, माजी लोकप्रतिनिधी सहकार्य करत नसताना गेल्या अनेक वर्षापासून संदीप खांडगेपाटील हे एकमेव महापालिका व राज्य सरकारदरबारी पाठपुरावा करून आमच्या समस्या सोडवत असल्याची प्रतिक्रिया मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासुन नवी मुंबईत कोरोनाच्या नव्या रूग्णांचा आकडा कमी जास्त होत आहे. पंधरा दिवसापूर्वी काही दिवस सतत कोरोनाचे नवे रूग्ण ३०० हून अधिक वाढत असल्याची चिंताजनक बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने कोव्हिड भत्ता दिलेला आहे, अपवाद फक्त पालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचा. कोरोना महामारीच्या काळात व आताही मूषक नियत्रंण कर्मचारी कार्य करत आहेत. रात्र-दिवस मुषक नियत्रंण कर्मचारी काम करत असूनही पालिका प्रशासनाने इतरांना कोव्हिड भत्ता दिलेला असताना मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. एकतर मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कधीही वेतन वेळेवर मिळालेले नाही. ठेकेदार या कर्मचाऱ्यांना दोन ते चार महिने गेल्या काही वर्षापासून वेतन विलंबानेच देत आहे. अनेक वर्षे या कर्मचाऱ्यांनी अवघ्या ५ हजार हजार रुपये वेतनावर काम केल्यानंतर व या समस्या निवारणासाठी आणि कर्मचाऱ्यांना समाधानकारक वेतन मिळावे यासाठी केवळ मी एकट्याने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली आहे. एरियससाठीही पाठपुरावा केल्यावरच या कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियस जमा झालेला आहे.
मूषक नियत्रंण कामगारांना कोव्हिड काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता मिळणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनातील अन्य सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला असताना आजवर केवळ मूषक नियत्रंण कामगारांना कोव्हिड भत्ता देण्यास पालिका प्रशासनाकडून सातत्याने चालढकल केली जात आहे. वेळकाढूपणा दाखविला जात आहे. या कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळावा म्हणून सातत्याने पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत आहे. आपल्या कार्यालयाकडून केवळ निवेदन संबंधितांना फॉरवर्ड केले जात आहे. पुढे काहीही कार्यवाही केली जात नाही. आपण फॉरवर्ड केलेल्या निवेदनांचे पुढे काय झाले आहे अथवा निवेदनांना केराची टोपली दाखविली आहे, याबाबत माहिती जाणून घ्यावी. मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांची वेतनाबाबतही सातत्याने ससेहोलपट होत असून गेल्या अनेक वर्षापासून केवळ याच कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने होत आहे. आता तर कोव्हिड भत्ता मिळण्यासही पालिका प्रशासनाकडून विलंब केला जात असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळावा यासाठी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे यापूर्वी ३० मे, ८ जुन, १६ जुन व २३ जुन रोजीही निवेदन सादर केले आहे. तसेच या समस्येचे गांभीर्य राज्य सरकारच्या निदर्शनास यावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना ३० मे, ८ जुन, १६ जुन व २३ जुन रोजी तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाही १ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे. त्यांनीही महापालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला नाही. कोव्हिड भत्ता मिळण्यास विलंब झाल्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कोव्हिड भत्ता देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.