अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवीन पुनर्रचनेतील महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, सारसोळे गावातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानातील चालण्याच्या जागेवर पावसाळा कालावधीत किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बामगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केलेली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊसाला सुरूवात झालेली आहे. आठ – दहा दिवस संततधार पाऊस पडल्यावर पदपथांवर, गावातील अंर्तगत पायवाटांवर, महापालिका उद्यानातील मॉर्निग वॉक व फिरण्यासाठी बनविलेल्या मार्गावर शेवाळ साचण्यास सुरूवात होते. पदपथ व गावातील पायवाटा, उद्यानातील चालण्याच्या जागा निसरड्या होत्या. त्यामुळे या ठिकाणाहून चालणाऱ्या रहीवाशांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना पाय घसरून पडल्याने जखमाही होत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या या उर्वरित अडीच महिन्याच्या कालावधीत किमान एक महिन्याच्या अंतराने पायवाटा, पदपथ, उद्यानातील चालण्याच्या जागा या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करून संबंधित जागांवर शेवाळ साचणार नाहीत, या जागा निसरड्या होणार नाहीत, या जागावरून चालताना कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासनाने महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, सारसोळे गावातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानात चालण्याच्या जागांवर किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
यापूर्वी महापालिका प्रशासनाला २५ जून २०२२ रोजी या समस्येबाबत निवेदन दिले होते. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ते निवेदन कार्यवाहीसाठी तात्काळ addlcommservices@nmmc.gov.in, Jaydeep Pawar dmc_garden @ nmmconline. com फॉरवर्डही केले, परंतु कार्यवाही काहीही झालेले नसल्याची नाराजी संदीप खांडगेपाटील यांनी व्यक्त केली आहे.