अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवीन पुनर्रचनेतील महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील परिसरात डासांचा त्रास वाढू लागल्याने मलेरिया व डेंग्यू या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी येथे व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला आहे. सांयकाळी ६ नंतर रहीवाशांना दारे-खिडक्या बंद करावी लागतात. सोसायटी आवारात तसेच उद्यानामध्ये सांयकाळी फिरणे आता डासांमुळे शक्य होत नाही. डासांमुळे रहीवाशी त्रस्त झाले आहेत. मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजाराचा परिसरात उद्रेक होण्याची भीती आहे. प्रभाग ३४ मध्ये पालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.