स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी सानपाडावासियांसाठी पंढरीच्या वारीचे आयोजन केले होते. या वारीत स्थानिक भागातील ७०० हून अधिक रहीवाशी सहभागी झाले होते.
प्रभाग ३० मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पांडुरंग आमले यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या वारीचे आयोजन केले होते. पावसाळा, घरातील कामे व अन्य कारणास्तव इच्छा असूनही विठ्ठल भक्तांना पंढरपुरला जाणे शक्य होत नाही. सानपाडा नोडमधील भाविकांना विठ्ठल सोहळ्यात रममाण होता यावे आणि त्यांना वारीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी पांडुरंग आमले यांनी या वारीचे आयोजन केले होते. सानपाडा सेक्टर २ मधील शिवमंदिरातून या वारीला सुरूवात झाली. प्रभाग ३० मधील सानपाडा सेक्टर २, ७,८,९, १० या परिसरातून ही दिंडी काढण्यात आली. या दिंडीत आविष्कार क्रिएशनचे आर. नाईक यांच्यासह त्यांचे ७० कलावंतही या दिंडीत सहभागी झाल्याने सानपाडा परिसर विठ्ठलाच्या भक्तिमय महापुरात रममाण झाल्याचे पहावयास मिळाले.
या दिंडी सोहळ्यात भाजपाचे पदाधिकारी, नेते मंडळी सतीश निकम, पंकज दळवी, रमेश शेट्ये, अशोक विधाते, रूपेश मढवी, सौ. श्वेता मढवी, आज्ञा गव्हाणे, मंगळ वाव्हळ यांच्यासह पामबीच कट्टाचे सदस्य, साईभक्त महिला फांऊडेशनच्या सदस्या, साईभक्त युवा तसेच स्थानिक रहीवाशी व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यासाठी पांडुरंग आमले, साईभक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांच्यासह साईभक्त महिला फाऊंडेशन व साई युवांनी परिश्रम घेतले.