नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, उद्यानातील चालण्याच्या जागेवर पावसाळा कालावधीत किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊसाला सुरूवात झालेली आहे. आठ – दहा दिवस संततधार पाऊस पडल्यावर पदपथांवर, गावातील अंर्तगत पायवाटांवर, महापालिका उद्यानातील मॉर्निग वॉक व फिरण्यासाठी बनविलेल्या मार्गावर शेवाळ साचण्यास सुरूवात होते. पदपथ व गावातील पायवाटा, उद्यानातील चालण्याच्या जागा निसरड्या होत्या. त्यामुळे या ठिकाणाहून चालणाऱ्या रहीवाशांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना पाय घसरून पडल्याने जखमाही होत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या या उर्वरित अडीच महिन्याच्या कालावधीत किमान एक महिन्याच्या अंतराने पायवाटा, पदपथ, उद्यानातील चालण्याच्या जागा या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करून संबंधित जागांवर शेवाळ साचणार नाहीत, या जागा निसरड्या होणार नाहीत, या जागावरून चालताना कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासनाने महापालिका प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानात चालण्याच्या जागांवर किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.