स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : भाजपाचे युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या (दि. २० जुलै ) वाढदिवसानिमित्त नेरूळ पश्चिम नोडमधील रहीवाशांकरीता विवीध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग ३४ मधील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील तसेच कुकशेत गावातील सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
१६ जुलै ते २० जुलैदरम्यान कुकशेत गावच्या क्रिडांगणावर पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै रोजी सांयकाळी साडे सहा वाजता झुलेलाल मंदिरातील हॉलमध्ये सारसोळे, कुकशेत व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकरीता ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि सत्कार तसेच दहावी-बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ जुलै रोजी दुपारी दोन ते सांयकाळी ७ वाजेपर्यत कुकशेत गावातील व्यायामशाळेमध्ये एमजीएम रूग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै रोजी नेरूळ सेक्टर सहामधील दर्शन दरबार येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २३ जुलै रोजी नेरूळ सेक्टर ८ मधील एल मार्केटजवळील भाजपा कार्यालयासमोर दहावी-बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील रहीवाशांनी तसेच सारसोळे आणि कुकशेतच्या ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्थांकडून तसेच प्रभाग ३४ मधील भाजप कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.