जीवन गव्हाणे : Navimumbailivew.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये साथीच्या आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी भाजपा युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. गेल्या पावणे तीन महिन्यापासून संततधार पाऊस पडत आहे. या परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यूची रूग्ण संख्या वाढीस लागलेली आहे. रहीवाशी खासगी दवाखाने, रुग्णालयात साथीच्या आजारावर तात्काळ उपचार करुन घेत आहे. खासगी दवाखान्यांमध्येही मलेरिया रुग्ण पहावयास मिळत आहेत. डासांच्या वाढत्या घनतेने रहीवाशांना दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवता येत नाही. सोसायटी आवारात फिरणे अवघड झाले आहे. डासांच्या उद्रेकावर नियत्रंण न मिळविल्यास साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे. प्रभाग ३० मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये व बाहेरील भागात धुरीकरण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्र्रशासनाकडे केली आहे.